इचलकरंजीतील चौकात हजारो युवक जमल्याने तणाव

By admin | Published: May 6, 2016 01:05 AM2016-05-06T01:05:33+5:302016-05-06T01:06:54+5:30

अफवेचा परिणाम : शॉपिंग सेंटर, लक्ष्मी मार्केट परिसरातील दुकाने बंद; आमदार हाळवणकर तसेच पोलिसांच्या आवाहनानंतर वातावरण निवळले

Tension prevents thousands of youths in Ichalkaranji square | इचलकरंजीतील चौकात हजारो युवक जमल्याने तणाव

इचलकरंजीतील चौकात हजारो युवक जमल्याने तणाव

Next

इचलकरंजी : आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून जवाहरनगरमधून संचलनास सुरुवात केली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक पोलिसांकडून हटविले जाणार असल्याची अफवा पसरल्याने जनता चौकामध्ये शेकडो युवक जमा झाले. जमाव अचानकपणे जमू लागल्यामुळे शॉपिंग सेंटर, शिवाजी उद्यान, लक्ष्मी मार्केट, मराठा मंडळ परिसरातील दुकाने बंद झाली. मात्र, आमदार सुरेश हाळवणकर व पोलिसांनी तेथे येऊन पोलिसांकडून फलक हटविले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तणाव निवळला.
शहर व परिसरामध्ये रविवारी (दि. ८) होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने डिजिटल फलक उभारले आहेत. काही डिजिटल फलकांवर आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या आणि गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींची छायाचित्रे झळकत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा होईल, अशा रीतीने, तसेच दुकाने झाकोळली जातील अशा प्रकारे फलक उभारल्याने दुकानदार-व्यावसायिक त्रस्त झाले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, आदींची बैठक झाली. सुमारे दोन तास झालेल्या बैठकीतील तपशील बाहेर समजू शकला नाही. मंगळवारी रात्री नगरपालिकेमध्ये झालेल्या पदाधिकारी, प्रशासन व पोलिस यांच्या बैठकीमध्ये १५ मे नंतर मंडळांना व संबंधित व्यक्तींना फलक हटविण्याचे आवाहन करण्याचे ठरले.
शहरातील काही डिजिटल फलक उतरून घेण्यात आल्याचे वृत्त शहरभर पसरले असतानाच गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या नेतृत्वाखाली जवाहरनगरमधून संचलन केले. त्यात दंगल नियंत्रण कृती दलाच्या पथकानेही भाग घेतला. संचलन सुरू असतानाच विविध ठिकाणचे डिजिटल फलक पोलिस यंत्रणेकडून हटविणार असल्याचे मेसेज मोबाईलवरून फिरू लागल्यामुळे युवक चौकात जमू लागले. ही संख्या हजारोंच्या घरात गेल्याने तणाव निर्माण झाला. परिसरामधील सर्व दुकाने बंद झाली. बॅँकांनीही शटर खाली ओढले. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्पिकरवरून जमावाला शांत राहण्यास सांगितले.

Web Title: Tension prevents thousands of youths in Ichalkaranji square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.