दत्तवाड येथे दोन गट समोरासमोर आल्यामुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:38+5:302021-01-16T04:26:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दत्तवाड - येथील मराठी शाळेसमोर दसरा चौकात प्रभाग क्रमांक तीनमधील दोन उमेदवारांचे गट समोरासमोर आल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दत्तवाड - येथील मराठी शाळेसमोर दसरा चौकात प्रभाग क्रमांक तीनमधील दोन उमेदवारांचे गट समोरासमोर आल्याने गुरुवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही गटांना बाजूला केल्यामुळे अनर्थ टळला.
दत्तवाड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील नूर काले गट व युवराज गट गुरुवारी समोरासमोर येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागल्याने तर काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. कुरुंदवाड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे, उपनिरीक्षक विकास अडसूळ, बीट अंमलदार चव्हाण यांनी दोन्ही गटांना वेळीच बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला. तथापि गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.