व्यावसायिकांना टेस्ट सक्तीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:37+5:302021-06-21T04:17:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रूकडी माणगाव माणगांव, ता.हातकणगंले येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने गावांतील सर्व व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते ...

Test compulsory for professionals | व्यावसायिकांना टेस्ट सक्तीची

व्यावसायिकांना टेस्ट सक्तीची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रूकडी माणगाव

माणगांव, ता.हातकणगंले येथील ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने गावांतील सर्व व्यावसायिक व भाजीपाला विक्रेते यांचे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे निर्णय घेतला असून या तपासणीनंतर व्यावसायिक यांना व्यवसाय सुरू करणेस मुभा देण्यात येणार आहे. जे व्यावसायिक तपासणी करणार नाहीत त्यांनी व्यवसाय सुरू करू नये, असे सक्त सूचना ही देण्यात आले आहे.

माणगांव येथे मध्यंतरी कोरोना संसर्ग वाढला होता यामुळे माणगांव ग्रामपंचायतीने लाॅकडाऊन ही केले होते. पण रुग्ण कमी होत नसल्याने ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने माणगांव परत लाॅकडाऊन केले या लाॅकडाऊनची मुदत काल रविवार दि. २० रोजी संपले असून गेली दोन दिवसात कोरोनाचा संसर्ग ही कमी झाला.

लाॅकडाऊन संपल्यानंतर आज दि २१पासून सर्व व्यवहार सुरू राहणार असल्याने परत संसर्ग वाढू नये यासाठी युध्द पातळीवर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, पोलीस पाटील करसिध्द जोग, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी कंबर कसले असून गावातील रुग्ण संख्या शून्यावर आणण्यासाठी झटत आहेत.

व्यावसायिकसह तेथील कर्मचारी यांचे तपासणीची व्यवस्था येथील शाळेत केले असून तपासणी अहवाल नंतरच व्यवसायास मुभा असणार आहे.

Web Title: Test compulsory for professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.