इचलकरंजीत मेडिकल दुकानदारांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:57+5:302021-05-21T04:25:57+5:30
इचलकरंजी : शहरातील मेडिकल दुकानदार व कर्मचाऱ्यांची गुरुवारी आरोग्य विभागाने अॅँटिजन तपासणी केली. दिवसभरात १४ मेडिकल दुकानांतील २५ आणि ...
इचलकरंजी : शहरातील मेडिकल दुकानदार व कर्मचाऱ्यांची गुरुवारी आरोग्य विभागाने अॅँटिजन तपासणी केली. दिवसभरात १४ मेडिकल दुकानांतील २५ आणि विनाकारण फिरणाऱ्या १३ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने दोन दिवसांपासून शहरातील मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्यांची अॅँटिजन चाचणी केली. पहिल्या दिवशी २२ दुकानांतील ६६ जणांची चाचणी केली असा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी शिवाजी पुतळा, डेक्कन व जवाहरनगर परिसरातील दुकानांतील सर्वांची चाचणी केली. त्यामध्ये २५ जण निगेटिव्ह आले. तसेच संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या १३ जणांची अॅँटीजन तपासणी केली. त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले.
फोटो ओळी
२००५२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत मेडिकल दुकानदार व कर्मचाऱ्यांची गुरुवारी आरोग्य विभागाने अॅँटिजन तपासणी केली.