‘एस.टी.पी.’ची चाचणी सुरू
By admin | Published: May 9, 2014 12:30 AM2014-05-09T00:30:00+5:302014-05-09T00:30:00+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एस.टी.पी.) पहिला टप्प्यातील सांडपाण्यावर आज (गुरुवार)पासूून महापालिकेने चाचणी सुरू केली.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एस.टी.पी.) पहिला टप्प्यातील सांडपाण्यावर आज (गुरुवार)पासूून महापालिकेने चाचणी सुरू केली. सायंकाळी सहा वाजता जयंती नाल्यातून केंद्राकडे पाणी सोडण्यात आले. रात्री दहाच्या सुमारास यशस्वीरीत्या पाणी एसटीपी केंद्रात पोहोचले. रात्रभर पाईपची चाचणी घेऊन उद्या (शुक्रवार) सांडपाण्यावर चाचणी केली जाणार आहे. उच्च न्यायालयात महापालिकेने काल (बुधवार) सायंकाळपासून केंद्राची चाचणी घेत असल्याचे स्षष्ट केले होते. यामुळे दिवसभर उपायुक्त संजय हेरवाडे, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, पर्यावरण सल्लागार उदय गायकवाड केंद्रावर थांबून होते. दिवसभर झडपांची चाचणी घेण्यात आली. यानंतर सायंकाळी प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले. जयंती नाला, दिग्विजय खानविलकर यांचा बंगला, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे कार्यालय चौक, शासकीय विश्रामगृहमार्गे तब्बल चार किलोमीटरची एक हजार एमएम व्यासाची लोखंडी पाईप टाकण्यात आली आहे. या पाईपमधून कमी दाबाने पाणी सोडण्यात आले. ही पाईपलाईन कॉँॅक्रीटच्या मुख्य रस्त्याखाली असल्याने गळती असल्यास ती समजण्यास अडचणी निर्माण होत होत्या. जयंती नाल्यापासून केंद्रापर्यंत जाण्यासाठी पाण्यास तब्बल तीन तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. पाणी पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाईपलाईन तपासणीचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)