चाचण्या घटल्या, कोरोना रुग्णही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:13+5:302021-09-04T04:30:13+5:30
काेल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याच कमी झाली असून परिणामी रुग्णसंख्याही कमी येत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी १० ...
काेल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याच कमी झाली असून परिणामी रुग्णसंख्याही कमी येत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी १० हजारांच्यावर होणाऱ्या चाचण्या आता ४ हजारपर्यंत खाली आल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासात नवे ११७ रुग्ण नोंदविण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात १,३७० कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर १३३ जणांनी गेल्या २४ तासात कोरोनावर मात केली आहे. पन्हाळा येथील ८५ वर्षीय पुरुष, कोल्हापूर येथील ५९ वर्षीय पुरुष आणि पाचगाव येथील ४५ वर्षीय पुरुष अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये नव्याने १८, करवीर तालुक्यात २१, तर हातकणंगले तालुक्यात १४ नागरिकांना नव्याने कोरोना झाला आहे. भुदरगड, गगनबावडा, तालुक्यात एकही नवा कोरोना रुग्ण नाही तर गडहिंग्लज, शिरोळ पेठवडगाव, मलकापूर, मुरगुड या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही नवा रुग्ण आढळलेला नाही.
चौकट
कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या अनेक तांत्रिक कामगारांना ३१ ऑगस्टपासून कमी केल्याने त्याचाही परिणाम स्वॅब संकलन आणि व्हॅक्सिनेशनवर झाल्याचे सांग्ण्यात आले. कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटरांची संख्या मोठी असल्याने या दोन्हीची माहिती अपलोड करण्यासही विलंब होत असल्याचे चित्र आहे.