दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:08 AM2017-09-12T01:08:37+5:302017-09-12T01:08:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.
महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मंत्री पाटील सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी भाजप सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत आलेले आॅनलाईन ७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत.
ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतकºयांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतकºयांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार असल्याने कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसºया मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणार
देवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विमानसेवेबाबत आज बैठक
कोल्हापूरच्या विमान सेवेबाबत डेक्कन चार्टर एव्हिएशन कंपनीच्या अधिकाºयांशी आज, मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विमान सुरू व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला पाहिजे, अनेकदा विमान सुरू होण्याच्या तारखा येतात, पण ते प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मी कोणताही नवा वायदा देणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगून टाकले. कोल्हापूर विमान सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या छोट्या शहरांसाठीच्या उड्डाण योजनेतून सप्टेंबर महिन्यात विमान सुरू होणार होते. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विमान सुरू करण्यासाठी होकार दिलेल्या डेक्कन चार्टर कंपनीसोबत आज, मंगळवारी चर्चा होणार आहे. विमान सेवा सुरू करायला कंपनी तयार आहे; पण वेळापत्रकाचा घोळ आहे. रात्रीची वेळ मिळाली आहे. ही वेळ चुकीची असल्याने आपण पुन्हा सकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान सेवा सुरू करणाºया कंपन्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही सेवा नक्की सुरू होईल परंतु जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत आश्वासन मी देणार नाही.’