वस्त्रनगरी अतिक्रमणाच्या विळख्यात (भाग १)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:24+5:302020-12-17T04:47:24+5:30

मालिकेचे मुख्य लीड इचलकरंजी : दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या वस्त्रनगरीचे हळूहळू विद्रुपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी व अपघात घडत आहेत. ...

Textile City Encroachment (Part 1) | वस्त्रनगरी अतिक्रमणाच्या विळख्यात (भाग १)

वस्त्रनगरी अतिक्रमणाच्या विळख्यात (भाग १)

Next

मालिकेचे मुख्य लीड

इचलकरंजी : दिवसेंदिवस अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या वस्त्रनगरीचे हळूहळू विद्रुपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी व अपघात घडत आहेत. त्यामुळे डिजिटल फलकमुक्त शहर केले. त्याप्रमाणेच अतिक्रमणमुक्त शहर करावे, अशी मागणी जोर धरत आहे. परंतु नगरपालिकेला याचे काहीच सोयरसुतक राहिले नाही. परिणामी नगरपालिकेच्या अशा ढिसाळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात मोठ्या इमारतींचे तळमजले पार्किंगऐवजी इतर वापरात, अनावश्यक फूटपाथ, फूटपाथवर पथविक्रेत्यांचे अतिक्रमण, मुव्हेबल गाळ्यांच्या नावे झालेली अतिक्रमणे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालले आहेत. त्यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका देत आहोत...

मोठमोठ्या इमारतींचा तळमजला पार्किंगऐवजी इतर वापरासाठी

मुख्य रस्त्यालगत पार्किंगचा बोजा

अतिक्रमणामुळे वस्त्रनगरीचे होत आहे विद्रुपीकरण

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील अतिक्रमणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर वेळीच कठोर निर्णय घेणे आवश्यक असताना नगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे महापुरुषांचे पुतळे व परिसर नूतनीकरण करून शहराचे सुशोभीकरण करत असल्याचे सांगितले जाते, परंतु अतिक्रमणाच्या विळख्यामुळे सुशोभीकरणाऐवजी विद्रुपीकरण सुरू झाले आहे. अनेक मिळकतधारक व वाणिज्य वापरासाठीच्या इमारती बिनदिक्कतपणे अतिक्रमण करून बांधकाम करीत आहेत. पार्किंगसाठीचे तळमजले व जागा अतिक्रमण करून बांधकाम केल्याने रस्त्यावर पार्किंगचा ताण वाढत आहे.

शहरातील मुख्य मार्गासह मध्यवर्ती ठिकाणांलगत उभारण्यात आलेल्या मोठमोठ्या इमारतींचे पार्किंगच्या नावाखाली बेसमेंट (तळमजला) खुदाई करून त्याची मोठ्या प्रमाणात मुरूम विक्री करून तेथे पार्किंगऐवजी गोडावून, हॉल करून ते भाड्याने देण्यात आले आहे. तसेच त्या इमारतींमधील वरील दोन-तीन मजलेही वाणिज्य वापरासाठी विविध दुकाने, शोरूम यांना भाड्याने देऊन चांगले अर्थार्जन करण्याचा उद्योग फार्मात सुरू झाला आहे. परंतु त्या सर्व दुकानगाळ्यांचे पार्किंग त्या इमारतींभोवती असलेल्या मुख्य मार्गावरच केले जाते. ग्राहकही रस्त्यालगत वाहने पार्किंग करून दुकानात जातात. त्यामुळे शहरातील सर्व वर्दळींच्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली असते. अशा ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसही नसतात. त्यामुळे वाहनधारकच वादावादी करत हॉर्न वाजवत मार्ग काढून निघून जातात. या प्रकारांमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चौकट

तक्रार आल्यास चर्चेतून तोडगा

अशा बेकायदेशीर उत्खननाबाबत अथवा बांधकामाबाबत नगरपालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर ‘चर्चेतून मार्ग’ काढणारी एक कारभाऱ्यांची टोळी कार्यरत असते. ज्याप्रमाणे चर्चा करून हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो, तो प्रकार वापरून संबंधिताला मार्ग काढून दिला जातो. या गंभीर प्रश्नांवर अनेक सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्रे वेळोवेळी आवाज उठवितात. मात्र, त्याकडेही निर्लज्जपणे दुर्लक्ष करून सोडून दिले जाते.

(फोटो ओळी)

१६१२२०२०-आयसीएच-०३

१६१२२०२०-आयसीएच-०४

इचलकरंजीत अशा अनेक व्यावसायिक इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्याचे पार्किंग रस्त्यावरच केले जाते.

(छाया - उत्तम पाटील)

Web Title: Textile City Encroachment (Part 1)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.