कापड व्यापाऱ्यांची दि मॅँचेस्टर मोटार मालक संघाकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:20+5:302021-07-19T04:17:20+5:30
इचलकरंजी : शहरातील कापड व्यापारी, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांची दिशाभूल करून व्यवसाय अडचणीत आणण्याचे काम दि मॅँचेस्टर मोटार मालक संघ करीत ...
इचलकरंजी : शहरातील कापड व्यापारी, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांची दिशाभूल करून व्यवसाय अडचणीत आणण्याचे काम दि मॅँचेस्टर मोटार मालक संघ करीत आहे. ट्रक भाडेवाढीसंदर्भात खोटे व बिनबुडाचे आरोप करत असल्याची माहिती दि इचलकरंजी गुडस् ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस व लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात, अहमदाबाद, पाली-बालोत्रा मार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यावसायिकांना असोसिएशनने परिस्थितीनुसार भाडेवाढ दिली आहे. मात्र, मॅँचेस्टर मोटार मालक संघ वस्त्रोद्योग व्यवसाय बंद पाडण्याचे अघोरी कृत्य करीत आहे. असोसिएशनने ट्रक भाडेवाढी संदर्भात दि मॅँचेस्टर मोटार मालक संघाला चर्चेसाठी निमंत्रित केले. परंतु कोणतीही सकारात्मक भूमिका न घेता गावास वेठीस धरून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वस्त्रोद्योग बंद पडल्यास यास असोसिएशन जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. पत्रकावर अध्यक्ष अशोक शिंदे, जितेंद्र जानवेकर, प्रदीप बहीरगुंडे, भरतसिंह चौधरी, संजय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.