बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:22 AM2018-12-31T00:22:55+5:302018-12-31T00:22:59+5:30

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ...

Texture exotic bounty seized | बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

Next

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला. या प्रकरणी संशयित स्वप्नील तानाजी कानकेकर (वय २६, रा. बापूरामनगर, कळंबा, ता. करवीर), ज्योतीराम महादेव पाटी७ल (३५, रा. कोगे, ता. करवीर), गणी नबीसो मुल्लाणी (३२, रा. शिरोली दुमाला, पोस्ट गल्ली, ता. करवीर) अशी मद्यतस्करांची नावे आहेत, तर गुन्हे अन्वेषण शाखेने विविध ठिकाणी छापे टाकून एक लाखाचा मद्यसाठा जप्त केला. .
अधिक माहिती अशी, ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर गोव्याहून महाराष्ट्र-कर्नाटकात बेकायदेशीररीत्या विदेशी मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. करवीर तालुक्यातील काही मद्यतस्करांनी गोव्याहून मद्यसाठा आणून ठेवला होता. ‘थर्टी फर्स्ट’ला त्याची ते विक्री करणार होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपविभागीय आयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली. त्यांनी निरीक्षक संभाजी बरगे व पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे सापळा रचला असता गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या संशयित कार (एमएच ०२ बीपी २७४६) पाठलाग करून थांबवण्यात आली. त्यात संशयित स्वप्निल कानकेकर हा आढळून आला. कारमध्ये पाठीमागे ठेवलेले बॉक्स आढळून आले. ते उघडून पाहिले असता विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.
मद्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता यामध्ये विविध ब्रँडच्या व वेगवेगळ्या बॅच क्रमांक असलेल्या बाटल्या सापडल्या. अधिक चौकशी केली असता रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य पुनर्भरण करून बुचे लावून नियमित किमतीपेक्षा कमी दराने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची कबुली संशयित कानकेकर याने दिली. हे मद्य कोठून आणले अशी विचारणा केली असता त्याने ते कोगे येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार ज्योतीराम पाटील (कोगे) व गणी मुल्लाणी (शिरोली दुमाला) या दोघांच्या घरी एकाच वेळी छापा टाकून बनावट विदेशी मद्य जप्त केले.

Web Title: Texture exotic bounty seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.