ठाण्याचा अक्षय ‘वाठार श्री’चा मानकरी
By admin | Published: April 5, 2016 11:50 PM2016-04-05T23:50:24+5:302016-04-06T00:05:08+5:30
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : पुण्याचा विनित शिंदे द्वितीय; सांगलीचा प्रवीण निकम तिसरा
नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथील ‘परफेक्ट फिटनेस’च्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या खुल्या गटात ‘वाठार श्री’चा बहुमान ठाणे येथील अक्षय मोगरकर याने पटकावला. त्याला रोख ३0 हजार व शिल्ड देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १०० शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. वारणेचे नेते माजी मंत्री विनय कोरे अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा संयोजक वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सात गटांत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : ६० किलो गट : नितीन दाखले (पुणे), सोमनाथ पाल (पुणे), मोईन सुफी (पुणे), नीतेश लगडेवाले (सोलापूर), ऋषिकेश वगरे (कोल्हापूर).
६५ किलो गट : अतुल साळोखे (पुणे), फरहान सय्यद (ठाणे), महंमद बेफारी (सांगली), सचिन थोरात (सांगली), राजेंद्र जाधव (कोल्हापूर). ७० किलो गट : रूपेश चव्हाण (पुणे), मुश्रीफ खान (नाशिक), विनायक लोखंडे (ठाणे), पंचलोणार (सोलापूर), किरण शिंदे (सांगली). ७५ किलो : अजिंक्य रेडेकर (कोल्हापूर), गणेश दसारिया (औरंगाबाद), विनय धुरेत (सिंधुदुर्ग), विजय कांबळे (पुणे), योगेश पवार (कोल्हापूर).
८० किलो : विजय भोई (धुळे), विशाल कांबळे (सांगली), अकबर कुरेशी (सोलापूर), नीळकंठ सव्वाशे (सातारा), जयंत देवकुळे (सांगली). खुला गट : अक्षय मोगरकर (ठाणे), विनित शिंदे (पुणे), प्रवीण निकम (सांगली), विठ्ठल गोवेकर (सिंधुदुर्ग), कृष्णा कडाले (पुणे-पिंपरी).
जिम मर्यादित गट : ‘परफेक्ट जिम श्री’ प्रमोद कुंभार, अजय सावंत, यश माने, विक्रांत कुंभार, विनोद जाधव.
यावेळी राष्ट्रीय पंच बिभिषण पाटील, राहुल परीट, परफेक्ट हेल्थचे अध्यक्ष संदीप चौगुले, उपाध्यक्ष शफीक पटाईत, सचिव विनायक शेटे, खजिनदार उल्हास पाटील, जावेद कुरणे, महेश जगपात, महेश कुंभार यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
स्पर्धेदरम्यान महिला शरीरसौष्ठवपटू वाघमारे यांची प्रात्यक्षिके झाली. त्याला क्रीडारसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. वाठारसारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित केल्याने महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचे कौतुक केले.