VidhanSabha Election 2024: उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, इच्छुकांची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:38 PM2024-10-21T17:38:40+5:302024-10-21T17:39:37+5:30

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी इच्छुकांची धांदल सुरू झाली आहे. कोणत्याही ...

The application process for assembly elections will start from tomorrow | VidhanSabha Election 2024: उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, इच्छुकांची धांदल

VidhanSabha Election 2024: उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, इच्छुकांची धांदल

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी इच्छुकांची धांदल सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात राहण्याचा निर्धार केलेल्यांनी उमेदवारी अर्जासोबतच्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील तहसील आणि प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज भरून घेण्यात येणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत पोलिस बंदोबस्तही तैनात असणार आहे. त्याचे नियोजन पोलिस प्रशासनाने केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर आहे. रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळालेले पहिल्या टप्प्यातच अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचीही उमेदवारांची यादी दोन दिवसात जाहीर होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. 

करवीर विधानसभा मतदारसंघासाठी बहुउद्देशीय हॉल रमणमळा तर उत्तरसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि दक्षिणसाठी करवीर प्रांताधिकारी व इचलकरंजीसाठी प्रांताधिकारी कार्यालय, चंदगड, राधानगरी, कागल, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ मतदारसंघाचे अर्ज तहसील कार्यालयात भरून घेणार आहेत. 

Web Title: The application process for assembly elections will start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.