प्रकाश बांदिवडेकरला अटक झाल्याने चंदगड तालुक्यात खळबळ, संबंधितांना पोलिसांच्या तपासाची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:23 PM2022-10-15T14:23:12+5:302022-10-15T14:23:42+5:30

अशोक बांदिवडेकर यांच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यावर डॉ. बांदिवडेकर यांनी साताऱ्यातील एका बड्या नेत्याला आणून वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चंदगडमधून विधानसभेसाठीही रणशिंग फुंकले होते.

The arrest of Prakash Bandivadekar caused excitement in Chandgad taluka | प्रकाश बांदिवडेकरला अटक झाल्याने चंदगड तालुक्यात खळबळ, संबंधितांना पोलिसांच्या तपासाची धास्ती

संग्रहित फोटो

googlenewsNext

चंदगड : बांदिवडेकर घराण्यातील व संबंधित असे एका पाठोपाठ नऊ खून झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आजही बांदिवडेकर खून प्रकरणाची दबक्या आवाजातच चर्चा केली जाते. त्यातील संबंधित डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला शुक्रवारी सकाळी पुणे पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथे ताब्यात घेतल्यामुळे तालुक्यातील खळबळ उडाली असून, त्यांच्याशी संबंधितांनी पोलिसांच्या तपासाची धास्ती घेतली आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेले ४ कोटींच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करत व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या कुख्यात गज्या मारणे टोळीच्या गुन्ह्यात डॉ. बांदिवडेकर सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही त्यांच्यावर १० ते १२ गुन्ह्यांची विविध ठिकाणी नोंद आहे. अशोक बांदिवडेकर यांच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यावर डॉ. बांदिवडेकर यांनी साताऱ्यातील एका बड्या नेत्याला आणून वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चंदगडमधून विधानसभेसाठीही रणशिंग फुंकले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यातून माघार घेत इंदोरला मुक्काम हलविला होता. त्यानंतर अधूनमधून चंदगड तालुक्यातील नागणवाडी येथील त्यांच्या मूळगावी त्यांचे येणे-जाणे सुरू होते. गेल्या आठ दिवसांपूर्वीही त्यांनी तालुक्यात विविध ठिकाणी भेट दिल्या होत्या.

अनेक गुन्ह्यांमधील सहभागाने शोध मोहीम होती सुरूच

बांदिवडेकर घराण्यातील खुनाचे सत्र थांबावे म्हणून तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख माधव सानप यांनी दोन्ही घराण्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतरही अशोक बांदिवडेकर यांचा खून झाला. त्याप्रकरणी डॉ. बांदिवडेकरसह अनेकांना साक्षीदार फितूर झाल्यामुळे क्लिनचीट मिळाली. पण कोल्हापुरातील क्रशर व्यावसायिक ख़ंडणीप्रकरणासह अनेक गुन्ह्याप्रकरणी त्यांचा शोध सुरूच होता.

चंदगड पोलिसांत ११ गुन्ह्यांची नोंद

डॉ. प्रकाश बांदिवडेकर याच्यावर १९९२, २०१२ मध्ये झालेल्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तसेच १९९७, ११९८, २०००, २०००, २००५ व २०२० हे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तर १९९८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी डॉ. बांदिवडेकर याला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाचीही शिक्षा झाली आहे.

Web Title: The arrest of Prakash Bandivadekar caused excitement in Chandgad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.