सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:47 PM2022-02-09T14:47:00+5:302022-02-09T14:59:05+5:30

व्यक्तिगत कारणातून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

The assailant was arrested in the murder case of social activist Suresh Gadge | सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरणी हल्लेखोरास अटक, अवघ्या बारा तासात संशयित गजाआड

Next

इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा काल, मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. या खूनप्रकरणातील हल्लेखोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

अवघ्या बारा तासांत शिवाजीनगर पोलिसांनी श्रवण कुमार श्यामसुंदर दायमा (वय ३३, रा. स्वामी अपार्टमेंट) याला अटक केली. व्यक्तिगत कारणातून त्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

व्यक्तीगत कारणातून खून झाल्याचे उघडकीस आले असले तरी अद्याप नेमके कारण समजू शकले नाही. ताब्यात घेतलेल्या श्रवण दायमा याच्यावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे रात्रीच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला. त्यात त्यांना गंभीर इजा झाली.

घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने यावेळी घटनास्थळावरुन पळ काढला होता. आज सकाळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
 

Web Title: The assailant was arrested in the murder case of social activist Suresh Gadge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.