Kolhapur: माणगाव‌ येथील कुबेर पाटील यांचे देहदान, तेरा वर्षापूर्वी केला होता संकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 04:05 PM2024-08-16T16:05:58+5:302024-08-16T16:06:23+5:30

आजारपणामुळे मृत्यू होवू नये म्हणून घ्यायचे विशेष काळजी

The body donation of Kuber Patil from Mangaon The resolution was made thirteen years ago | Kolhapur: माणगाव‌ येथील कुबेर पाटील यांचे देहदान, तेरा वर्षापूर्वी केला होता संकल्प 

Kolhapur: माणगाव‌ येथील कुबेर पाटील यांचे देहदान, तेरा वर्षापूर्वी केला होता संकल्प 

अभय व्हनवाडे 

रूकडी/माणगाव: माणगाव ता. हातकणगंले येथील कुबेर आण्णा पाटील (आमगोंडा) (वय ८०) यांनी मृत्यू पश्चात देहदान करावे असे लेखी लिहीलेल्या पत्रा आधारे त्यांचे देहदान करण्यात आले.‌ त्यांच्या या निर्णयामुळे गावात देहदान चळवळीला बळ मिळाले. याआधी पारीसा कोरगांवे यांनी मृत्यू पश्चात नेत्रदान केले होते. त्यानंतर कुबेर पाटील यांनी ‌देहदान करून चळवळीस प्रेरणा दिली.

शाकाहारचे पुरस्कर्ते कुबेर पाटील १९७२ साली  बी कॉम पदवीधारण केली. ते माध्यमिक शिक्षक म्हणून कोकणात कार्यरत असताना ते राहत असलेला ठिकाणी पशुहत्या होत असल्याने त्यांनी शिक्षकीपेक्षा सोडून एलएलबी शिक्षण घेतले. पण, वडिलांच्या रेट्यामुळे त्यांनी तात्कालीन महावीर बँक येथे तब्बल तीस वर्ष नोकरी केली अन् १९९६ साली नोकरीचा राजीनामा दिला.
त्यांच्या मित्र परिवारामध्ये देहदान‌ चळवळीबाबत चर्चा व संवाद होत असल्याने त्यांनी २०११ ला सीपीआर येथे देहदान बाबत अर्ज ही केला‌ होता.

कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित आल्यानंतर ते नेहमी मरणानंतर देहदान करावे असा रेटा धरत होते. शिवाय देहदानबाबत घरी सर्वांची जागरूती करत. काल, गुरुवारी (दि .१५) पहाटे त्यांचे निधन झाले. मृत्यूनंतर त्यांचा देह कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आजरपणामुळे मृत्यू होवू नये म्हणून घ्यायचे विशेष काळजी

कुबेर पाटील यांच्या पत्नीचे २०१९ ला निधन झाले. निधनानंतर देहदान करण्याचा त्यांचा संकल्प होता. पण आजरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने संकल्प पूर्ण होवू शकला नाही. यामुळे ते आपला मृत्यू आजाराने होवू नये याकरिता नेहमी  योगासन, साधा आहार तसेच व्यायाम करीत होते.

Web Title: The body donation of Kuber Patil from Mangaon The resolution was made thirteen years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.