कोल्हापुरातील शिये येथे दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला, लैंगिक अत्त्याचार करून खून केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 14:44 IST2024-08-22T14:43:47+5:302024-08-22T14:44:32+5:30
कोल्हापूर : बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा ...

कोल्हापुरातील शिये येथे दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळला, लैंगिक अत्त्याचार करून खून केल्याचा संशय
कोल्हापूर: बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच कोल्हापुरात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. लैंगिक अत्त्याचार करून हा खून केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळ्यासाठी कोल्हापूरमध्ये असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
करवीर तालुक्यातील शिये गावात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. काल, बुधवार सायंकाळ पासून मृत मुलगी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.