तुळशी नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत सापडला सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:26 PM2023-04-19T22:26:50+5:302023-04-19T22:30:58+5:30

त दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या येथील गणेश संजय शिंदे ( वय २७ ) या युवकाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

The body of a young man who went missing seven days ago was found in a rotten state in Tulsi river | तुळशी नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत सापडला सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह

तुळशी नदीपात्रात सडलेल्या अवस्थेत सापडला सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह

googlenewsNext

म्हालसवडे : कसबा आरळे ( ता. करवीर ) या गावाच्या शेजारील तुळशी नदीच्या पात्रात बुधवारी ( दि. १९ ) दुपारी युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. सात दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या येथील गणेश संजय शिंदे ( वय २७ ) या युवकाचा तो मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे. याची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

तुळशी नदी शेजारील शेतात काम करणाऱ्या कांचनवाडी  येथील  शेतकऱ्यांना नदीच्या पात्रात झुडपात अडकलेला मृतदेह निदर्शनास आला. पोलीस पाटील उत्तम कांबळे यांनी करवीर पोलिसांना दुर्घटनेची माहिती कळवली . पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सडलेला व अतिशय दुर्गंधी पसरलेला मृतदेह प्रीतम केसरकर (सडोली दुमाला), विशाल पाटील, गणेश पाटील, विनोद कांबळे व मेघनाथ पाटील ( कसबा आरळे ) या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नदीपात्रातून बाहेर काढला.

        सढलेला व माशांनी खालेल्या मृतदेहाच्या अंगावर कपडेही नसल्याने ओळख पटवणे अवघड झाले होते. येथील गणेश शिंदे हा मतिमंद युवक गुरुवार ( दि. १३) रोजी सायंकाळी घरातून गायब झाला होता. याची नोंद करवीर पोलिसात त्या वेळीच  करण्यात आली होती. नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाची खात्री पोलिसांनी कुटुंबियांकडून पटवून घेतली. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मतिमंद असणारा पण धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गणेशच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती. त्याच्या पश्चात आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.
 

Web Title: The body of a young man who went missing seven days ago was found in a rotten state in Tulsi river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.