कोल्हापूर: दूधगंगा नदीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 05:50 PM2022-07-15T17:50:14+5:302022-07-15T17:56:20+5:30

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली.

The car fell into the river Dudhganga, fortunately there was no loss of life | कोल्हापूर: दूधगंगा नदीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

कोल्हापूर: दूधगंगा नदीत कार कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली

googlenewsNext

मिलिंद देशपांडे

दत्तवाड : रस्त्यात असलेल्या वळणाचा अंदाज न आल्यामुळे दानवाड येथील दूधगंगा नदीतील पुराच्या पाण्यात कार कोसळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज, शुक्रवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलाजवळ ही घटना घडली.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून धुवांधार पाऊस सुरु आहे. यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलाजवळ दुर्घटना घडली. रस्त्याचा अंदाज न आल्याने कार दूधगंगा नदीत कोसळली.

कार चालक सकाळी एकसंबा कर्नाटक येथून महाराष्ट्रातील दानवाडकडे येत होता. यावेळी दानवाड जवळील दूधगंगा नदीच्या पुलावर असणाऱ्या वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार पुराच्या पाण्यात कोसळली. कारमध्ये फक्त वाहन चालक होता. कार कोसळतात आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. गाडीला दोर बांधून कारमधील चालकाला बाहेर काढले व गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: The car fell into the river Dudhganga, fortunately there was no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.