शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापूर शहर होणार स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 03:30 PM2022-04-15T15:30:42+5:302022-04-15T15:31:16+5:30

६ मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या दिवशी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

The city of Kolhapur will be stunned to pay homage to Shahu Maharaj | शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापूर शहर होणार स्तब्ध

शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी कोल्हापूर शहर होणार स्तब्ध

googlenewsNext

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोकांतर्फे लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व १८ एप्रिल ते २२ मे २०२२ या कालावधीत विविध उपक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, ६ मे रोजी शाहू समाधी स्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या दिवशी लोकराजाला कोल्हापूरच्या जनतेकडून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

कृतज्ञता पर्वाला १८ एप्रिलला सुरुवात होणार आहे. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा, आदेश, छायाचित्रांचे शाहू मिल येथे प्रदर्शन होईल. मॅरेथॉन, दागिन्यांची जत्रा, पुस्तक प्रदर्शन, शालेय मुलांसाठी शाहू महाराजांच्या जीवन व कार्यावर तालुकास्तरीय कथाकथन, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येतील. १ मे रोजी सायकल रॅली होईल. ६ मेला शहरात सकाळी शाहू जन्मस्थळ, नवा राजवाडा, रेल्वे स्टेशन, शाहू मिल, साठमारी, कुस्ती मैदान, बावडेकर आखाडा, गंगावेस तालीम, शिवसागर, रजपूतवाडी, भवानी मंडप येथून कृतज्ञता फेरी काढण्यात येणार आहे. फेरीनंतर शाहू समाधी स्थळ येथे पुष्पांजली वाहण्यात येईल. त्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर आदरांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य कृतज्ञता पर्वाचा कार्यक्रम होईल. याच दरम्यान चित्ररथ फेरी सुरू होईल.

लक्ष्मीपुरीमध्ये कोल्हापूर मिरची, मसाला जत्रा, कापड जत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मेपासून शालेय स्तरावर कुस्ती स्पर्धा होतील. २१ ते २२ मेदरम्यान खासबाग मैदान येथे निमंत्रित मल्लांच्या शाहू केसरी स्पर्धा होतील. यावेळी शाहू महाराजांनी आश्रय दिलेल्या मल्लांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा होईल. शाहू फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात येईल. नाटक, शाहिरी, संगीत नाटक, मर्दानी खेळ आदी कार्यक्रम होतील.

Web Title: The city of Kolhapur will be stunned to pay homage to Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.