Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 04:07 PM2024-07-08T16:07:16+5:302024-07-08T16:08:43+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील सुहास व स्वप्निल यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का ...

The death of the mother also resulted in the death of both the children, Incident at Koparde in Shahuwadi Taluka kolhapur | Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू

Kolhapur: दोन लेकरांच्या मृत्यूच्या धसक्याने आईचाही मृत्यू

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील सुहास व स्वप्निल यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने आई नंदाताई कृष्णा पाटील (वय ५६) यांचा शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. हे वृत्त समजताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.

कोपार्डे गावातील सख्खे भाऊ सुहास व स्वप्निल पाटील यांचा बुधवार दि. ३ जुलै रोजी शेतात तणनाशके फवारताना महावितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या तारेस स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. दोन्ही कमावती मुले काळाने हिरावून घेतली. म्हातारपणी आधार देणारे आधारच नाहीसे झाले. 

त्या माऊलीची मुले गेल्यापासून डोळ्याचे पाणी हटत नव्हते. घरी भेटायला येणारे पै-पाहुणे,नातेवाईक व ग्रामस्थ त्या माऊलीची अवस्था पाहून थिजून जात. अवघ्या तीन दिवसांनी शनिवारी दि.६ जुलै रोजी मध्यरात्री मुलांच्या विरहाने आई नंदाताई पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Web Title: The death of the mother also resulted in the death of both the children, Incident at Koparde in Shahuwadi Taluka kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.