Kolhapur: पेट्रोल पंपावरील जमा रक्कम दिलीच नाही, मॅनेजरने मालकाला घातला आठ लाखांचा गंडा

By उद्धव गोडसे | Published: November 8, 2023 12:04 PM2023-11-08T12:04:22+5:302023-11-08T12:04:41+5:30

कोल्हापूर : पेट्रोल पंप मालकाने विश्वासाने नेमलेल्या मॅनेजरनेच विश्वासघात करून मालकाला सात लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा ...

The deposit at the petrol pump was not paid, the manager charged the owner with a sum of eight lakhs in kolhapur | Kolhapur: पेट्रोल पंपावरील जमा रक्कम दिलीच नाही, मॅनेजरने मालकाला घातला आठ लाखांचा गंडा

Kolhapur: पेट्रोल पंपावरील जमा रक्कम दिलीच नाही, मॅनेजरने मालकाला घातला आठ लाखांचा गंडा

कोल्हापूर : पेट्रोल पंप मालकाने विश्वासाने नेमलेल्या मॅनेजरनेच विश्वासघात करून मालकाला सात लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जवाहरनगर येथील समर्थ पेट्रोल पंप येथे घडला.

याबाबत पेट्रोल पंप मालक विश्वास खुशाली वराडकर (वय ४५, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मॅनेजर शंकर माधवराव नाईक (वय ५२, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरनगर येथे वराडकर यांच्या मालकीचा समर्थ पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी त्यांनी शंकर नाईक याची मॅनेजरपदी नेमणूक केली होती. नाईक याने ११ जुलै ते सात नोव्हेंबर २०२३ दरम्यान २८ ऑगस्टची जमा रक्कम आणि पिग्मीची रक्कम सात लाख ८५ हजार रुपये मालकाला दिले नाहीत.

गेल्या तीन महिन्यातील जमा-खर्चाचा हिशोब तपासताना ही बाब लक्षात आली. त्यानंतर वराडकर यांनी मॅनेजर नाईक याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: The deposit at the petrol pump was not paid, the manager charged the owner with a sum of eight lakhs in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.