Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ 

By उद्धव गोडसे | Published: April 20, 2023 12:40 PM2023-04-20T12:40:27+5:302023-04-20T12:40:57+5:30

मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेऊन हे सीपीआरच्या आवारात कोणी टाकले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला.

the dogs broke the cords of the dead infant In CPR Kolhapur | Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ 

Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ 

googlenewsNext

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये पीएम रुमच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडले. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) सकाळी निदर्शनास आल्यानंतर सीपीआरमध्ये एकच खळबळ उडाली. मृत अर्भक कोणी आणून टाकले, की सीपीआरमधील कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांनी वैद्यकीय कच-यातून ओढून आणले याचा शोध पोलिस आणि सीपीआरमधील अधिका-यांकडून सुरू आहे.

सीपीआरमध्ये रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. प्रसूती विभागातही रुग्णांची मोठी गर्दी असते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पीएम रुमच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि बाजूच्या रिकाच्या जागेत भटक्या कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात होते. हा प्रकार काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती सीपीआरमधील कर्मचा-यांना दिली. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसही सीपीआरमध्ये पोहोचले. मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेऊन हे सीपीआरच्या आवारात कोणी टाकले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला.

सीपीआरच्या वैद्यकीय कच-यातून कुत्र्यांनी मृत अर्भक ओढून आणले असावे, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. असे असेल तर मृत अर्भक कच-यात कोणी टाकले, कच-यापर्यंत भटकी कुत्री कशी पोहोचतात, याची चौकशी सीपीआरमधील अधिका-यांनी सुरू केली आहे. या घटनेने सीपीआरमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: the dogs broke the cords of the dead infant In CPR Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.