यू-ट्युबवरून माहिती मिळवून तयार केल्या बनावट नोटा, मशीन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:35 PM2022-08-29T12:35:02+5:302022-08-29T12:35:39+5:30

झटपट पैसे कमविण्याच्या नादात घुलेसह त्याचा मित्र वडरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

The fake notes found at Mahagaon in Gadhinglaj taluka were created by getting information from YouTube, Seize the machine | यू-ट्युबवरून माहिती मिळवून तयार केल्या बनावट नोटा, मशीन जप्त

यू-ट्युबवरून माहिती मिळवून तयार केल्या बनावट नोटा, मशीन जप्त

Next

गडहिंग्लज : महागाव येथे सापडलेल्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन गडहिंग्लज पोलिसांनी जप्त केली. यातील मुख्य सूत्रधार अब्दुलरजाक आब्बासाहेब मकानदार (वय २५, रा. एकसंबा रोड, मेहबूबनगर, चिक्कोडी), अनिकेत शंकर हुले (२०, रा. महागाव, ता. गडहिंग्लज), संजय आनंदा वंडर (३५, सध्या रा. शिक्षक कॉलनी नेसरी मूळगाव महागाव) यांना सोमवार (२९) अखेर पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना महागाव येथील पाच रस्ता चौकात दोघे जण बनावट नोटा खपविण्यासाठी येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला होता.

शनिवारी (दि-२७) दुपारी चिक्कोडीहून गडहिंग्लजमार्गे महागावला आलेल्या मकानदार याने पाच रस्ता चौकात थांबलेल्या घुले व वडर यांची भेट घेतली. त्यांच्या हालचालीवरून संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटरसायकली सह ५००, २०० व १०० रुपयांच्या १ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

दरम्यान, मकानदार याने आपणच बनावट नोटा तयार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या चिक्कोडी येथील राहत्या घरात बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेला प्रिंटर, शाई व कागद पोलिसांनी जप्त केले आहेत. रविवारी (२८) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे अधिक तपास करीत आहेत.

यू-ट्युबवरून नोटांची नक्कल !

मकानदार हा सेंट्रिगबरोबरच देवदेवतांचे फोटो व ताईत बनवून देत होता. त्यातूनच घुले व त्याची ओळख झाली. दरम्यान, मकानदारने यू-ट्युबवरून माहिती मिळवून महिनाभरात सुमारे २ लाखांच्या हुबेहूब नोटा तयार केल्या होत्या. त्या 'नोटा' खपवण्यासाठी भरपूर कमिशन देण्याचे आमिष घुलेला दाखविले होते. यातूनच झटपट पैसे कमविण्याच्या नादात घुलेसह त्याचा मित्र वडरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Web Title: The fake notes found at Mahagaon in Gadhinglaj taluka were created by getting information from YouTube, Seize the machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.