शेतकरी बांधवांनी वावरातून दिली लोकराजाला मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:02 PM2022-05-06T13:02:01+5:302022-05-06T13:14:51+5:30

दुर्वा दळवी कोल्हापूर : "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हा विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज, ...

The farmers paid homage to Lokaraja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj | शेतकरी बांधवांनी वावरातून दिली लोकराजाला मानवंदना

शेतकरी बांधवांनी वावरातून दिली लोकराजाला मानवंदना

googlenewsNext

दुर्वा दळवी

कोल्हापूर: "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हा विचार देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता १०० सेकंद अवघं कोल्हापूर स्तब्ध झाले. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्धता पाळत शाहूरायांना मानवंदना दिली. ग्रामीण भागातही शेतकरी बांधवांनी वावरातच १०० सेकंद स्तब्धता पाळत आदराजंली वाहिली.

दरम्यान, सावर्डे गावात मेंढपाळ यांनीही शेतातूनच स्तब्धता पाळत लोकराजाला आदरांजली वाहिली. हा मनाला भावणारा फोटो लोकमतचे प्रतिनिधी संतोष कुंभार यांनी टिपला आहे. तर थेट शेतात काम करताना शेतकरी बांधवांनीही आपल्या राजाला मानवंदना दिली. आजही शाहूराजाबद्दल नागरिकांच्या मनात असलेली कृतज्ञता यावरुन दिसून येते. समस्त कोल्हापूरकरांनी आपल्या राजासाठी १०० सेकंद स्तब्धता पाळत मानवंदना दिली.

पनोरी ता.राधानगरी येथील ऊस भांगलण करणाऱ्या महिलांनी व शेतमजुरांनी स्तब्धता पाळून कृतज्ञता व्यक्त केली

शाहूंना अभिवादन करताना आजरा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक


शिरगाव ता. राधानगरी ) येथील मुख्य चौकात युवक, तरूण मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शाहूराजाला अभिवादन केले

पेठवडगावमध्ये इदगाह मैदान येथे रस्त्याचे काम सुरू असताना महिलासह पुरूषांनी १०० सेकंद स्तब्ध राहत शाहूंना आदरांजली वाहली

Web Title: The farmers paid homage to Lokaraja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.