छ. शिवराय ज्या मार्गानं पन्हाळ्यातून निसटले; त्या राज दिंडी येथील तटबंदी कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:36 PM2022-08-21T19:36:25+5:302022-08-21T19:36:45+5:30
महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत येत आहे. तर तटबंदी व वरील भाग हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो.
पन्हाळा - शनिवारी मध्य रात्री नंतर राज दिंडी येथील गडाला संरक्षण देण्यासाठी असलेली तटबंदी कोसळली, यामध्ये तटबंदीचे काही मोठे लहान दगड, शाडूचे मोठे काही भाग या मुख्य मार्गावर कोसळले असल्यामुळे हा मार्ग आता धोकादायक बनला असून आणखीन तटबंदीचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.
पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून विशाळगडाकडे जाण्यासाठी बाहेर पडलेला मार्ग म्हणजे राज दिंडी, राजांची पालखी या मार्गे गेली होती म्हणून या मार्गाला राज दिंडी असे म्हटले जाते. महाराज इथूनच विशाळगडला जाण्यासाठी या मार्गाने गेले होते हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारीत येत आहे. तर तटबंदी व वरील भाग हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो. सध्या वनविभागाने गडावरील नागरिकांच्या शेतजमीनी खालील वाड्या वस्तीमध्ये असल्याने नागरीकांना व वाडी वस्तीतील लोकांना गडावर ये जा करण्यासाठी पायी मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. कोसळलेल्या तटबंदीची वनविभाग व पुरातत्व विभाग यांनी पाहणी केली आहे. वनविभाग व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, पडलेल्या तटबंदीचा भाग पाहण्यासाठी व तटबंदीवर जाऊन फोटो काढण्यासाठी, आपला जीव धोक्यात घालून कोणीही या परीसरात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.