वाळू उपसासंबंधी शासन सकारात्मक, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:35 PM2022-11-17T17:35:48+5:302022-11-17T17:36:08+5:30

उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार

The government will take a positive decision regarding sand extraction, informed Minister Radhakrishna Vikhe-Patil | वाळू उपसासंबंधी शासन सकारात्मक, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनी दिली माहिती

संग्रहित फोटो

googlenewsNext

इचलकरंजी : महापुराचे नियोजन करण्यासाठी नदीपात्रातील वाळू उपसा करून पात्र खोल करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच दगडाच्या खाणी व क्रशरसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाच्या जाचक अटींना स्थगिती मिळाल्याने गौणखनिज व्यवसाय पूर्ववत होईल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील दगड खाण व वाळू व्यावसायिकांसोबत मंत्री विखे-पाटील यांची मंत्रालयात महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. वडार समाजाच्या कुटुंबाला २०० ब्रास रॉयल्टी माफ करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर संबंधित जिल्हाधिकारी पातळीवर निपटारा करून दिलासा दिला जाईल, असे निर्णय झाले असल्याची माहिती इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिली.

प्रक्रिया ऑनलाइन

उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

Web Title: The government will take a positive decision regarding sand extraction, informed Minister Radhakrishna Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.