नवऱ्या मुलाने साखरपुड्याचा फोटो डीपीला लावला, अन्..; कोल्हापुरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:29 PM2022-04-08T12:29:39+5:302022-04-08T12:30:19+5:30

अल्पवयीन मुलीसोबतच्या साखरपुड्याचा फोटो नवऱ्या मुलाने डीपीला लावला, हे बघताच सुज्ञ व्यक्तीला मुलगी लहान असल्याची शंका आली आणि त्यांनी ही बाब चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा महिला व बालविकास विभागासह पोलिसांनी गुुरुवारी होणारा बालविवाह रोखला.

The groom posted a photo of the girl to the DP and Child marriage prevented in Kolhapur | नवऱ्या मुलाने साखरपुड्याचा फोटो डीपीला लावला, अन्..; कोल्हापुरातील प्रकार

नवऱ्या मुलाने साखरपुड्याचा फोटो डीपीला लावला, अन्..; कोल्हापुरातील प्रकार

googlenewsNext

कोल्हापूर : संभाजीनगर मैलखड्डा येथील अल्पवयीन मुलीसोबतच्या साखरपुड्याचा फोटो नवऱ्या मुलाने डीपीला लावला, हे बघताच सुज्ञ व्यक्तीला मुलगी लहान असल्याची शंका आली आणि त्यांनी ही बाब चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा महिला व बालविकास विभागासह पोलिसांनी गुुरुवारी होणारा बालविवाह रोखला. गेल्याच आठवड्यात नेहरूनगरातील बालविवाह उघडकीस आला होता.

संभाजीनगर येथील १५ वर्षे ६ महिने वय असलेल्या मुलीचा ५ एप्रिलला परिसरातील २२ वर्षीय मुलासोबत साखरपुडा झाला होता. मुलाने साखरपुड्यातील हार घातलेला फोटो आपल्या डीपीला लावला हे पाहिल्यानंतर सुज्ञ नागरिकांना मुलगी लहान असल्याचे व बालविवाह झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी ही बाब चाईल्डलाईन संस्थेला कळविली. त्यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील यांना कळवले. त्यावर तातडीने कार्यवाही करत पोलीस विभागातील पोलीस जमादार रमेश डोईफोडे, संस्थात्मक संरक्षण अधिकारी सुलभा माने, चाईल्ड लाईनच्या तेजस्वी मदने, सुरैय्या मकबुल शिकलगार यांनी घटनास्थळी भेट दिली असता  मुलीने आपला साखरपुडा झाल्याचे सांगितले.

यावेळी तिच्यासाबेत लग्न ठरलेल्या मुलालाही बोलावण्यात आले. मुलीचे आधार कार्ड पाहिल्यावर तिची जन्मतारीख सप्टेंबर २००६ असून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विभागातील अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांनाही बोलावण्यात आले. बालिकेच्या पालकांना व मुलाच्या पालकांना बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे सांगून बालविवाह रोखण्यात आला.

अगतिकता अशीही..

मुलीच्या आईने सांगितले की, वडील व्यसनी आहेत. मी कामावर गेल्यावर मुलगी एकटी घरी असते. ती नववीत आहे. पण, शिक्षणाची आवड नसल्याने शाळेत जात नाही.

Web Title: The groom posted a photo of the girl to the DP and Child marriage prevented in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.