गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली

By तानाजी पोवार | Published: July 27, 2022 06:14 PM2022-07-27T18:14:35+5:302022-07-27T18:27:18+5:30

पुढील सुनावणीस सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश

The guilt determination hearing in the Govind Pansare murder case will be held on August 5 | गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: तावडे, कळसकर, अंदुरे व गायकवाडला न्यायालयात केलं हजर; सुनावणी पुढे ढकलली

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी उपस्थित नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी दि. ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. आज, बुधवारी न्यायालयात संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर व समीर गायकवाड हे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश तीन एस. एस. तांबे यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते.

आजच्या सुनावणीस वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे व समीर गायकवाड हे चार संशयित न्यायालयात उपस्थित होते. इतर पाच संशयित हे बेंगलोर येथील कारागृहात असल्याने तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत.  

दोष निश्चिती सुनावणीवेळी सर्व संशयित आरोपी न्यायालयात समोर असावेत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे त्यांची सुनावणी घेऊ नये अशी विनंती आरोपींचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार पुढील सुनावणी दि. ५ ऑगस्ट रोजी होणार आहे, त्यावेळी सर्व संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: The guilt determination hearing in the Govind Pansare murder case will be held on August 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.