थेट पाईपलाईन संदर्भातील सोळांकुरमधील बैठक निष्फळ, दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:23 PM2022-04-13T19:23:15+5:302022-04-13T19:29:08+5:30
सोळांकूर: सोळांकूर गावातील मुख्य रस्त्यावर सुरू असलेले काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी बंद पाडले. हे काम सुरु ...
सोळांकूर: सोळांकूर गावातील मुख्य रस्त्यावर सुरू असलेले काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी बंद पाडले. हे काम सुरु होण्याच्या दृष्टीने महापालिका अधिकारी व सोळांकूर ग्रामस्थ यांच्यामधे गणेश मंदीर येथे आज बैठक झाली. परंतु अधिकाऱ्यांच्या असमाधानकारक उत्तराने तसेच योग्य तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली.
वरिष्ठांना आपल्या भावना कळवून येत्या दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाईल असे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने महापालिकेस विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. मागण्या मान्य केल्या तरच काम सुरू करण्यास मान्यता देण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामपंचायतीने रस्ता ब्रेकरने फोड नये, पाईप घातलेला रस्ता पाठोपाठ पूर्ण करावा, पाईपलाईन मार्गाजवळील घरांचे स्टरक्चर आँडीट करून घरांचे व्हँल्युशन करावे, आदी. मागण्यांचे महापालिकेस निवेदन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सरपंच आर वाय पाटील, संतोष पाटील, अमित पाटील, शोभा गुरव, सुमन पाटील, मुकुंद पानारी, अंजना कारेकर, बळवंत शिंदे, राजलक्ष्मी नारकर, मारुती मुधोळकर, ए. टी. पाटील, विश्वास पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.एस.इंगवले, शाखा अभियंता एस के किल्लेदार महापालिकाचे जल अभियंता हर्षजित घाटगे, जीकेसी कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेंद माळी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आपल्या भावना वरिष्ठांना कळवल्या जातील असे सांगितले.