Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:34 AM2023-06-15T11:34:30+5:302023-06-15T11:57:46+5:30

विवाह निश्चित झाल्यामुळे जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. विवाह होताच दोघांनी पंचगंगा नदीपात्र उतरुन जलपर्णी काढली.

The newly weds of Ichalkaranji in Kolhapur went down to the river Panchganga and took water leaves | Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

googlenewsNext

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी गेल्या ६५ दिवसांपासून मोहीम सुरू आहे. त्यामध्ये सामाजिक संस्था माणुसकी फाउंडेशन महापालिकेच्या मदतीने आघाडीवर आहे. या संघटनेचे सदस्य कृष्णा इंगळे यांचा विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्याने चक्क पंचगंगा नदीत उतरून जलपर्णी हटाव मोहिमेत योगदान दिले. याची चर्चा दिवसभर शहर परिसरात सुरू होती.

मोहीम सुरू झाल्यापासून नियमित येणारे फाउंडेशनचे सदस्य कृष्णा यांचा विवाह निश्चित झाल्यामुळे विधीसाठी १० जूनपासून ते जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. त्यामुळे १३ जून २०२३ रोजी विवाह झाल्यानंतर सर्वप्रथम श्री वरदविनायक गणपती मंदिर येथे गणरायाचे आशीर्वाद घेतल्यावर आपल्या नववधूला हा आपला मानस त्यांनी सांगितला. नववधू शिवानी यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या साथीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार दोघांनी पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढली.

Web Title: The newly weds of Ichalkaranji in Kolhapur went down to the river Panchganga and took water leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.