Kolhapur: अवयवदानाची चळवळ अजूनही कागदावरील इच्छेपुरतीच, पुरेशा यंत्रणेअभावी चळवळीला खो

By संदीप आडनाईक | Published: May 18, 2024 06:48 PM2024-05-18T18:48:13+5:302024-05-18T18:48:34+5:30

कोल्हापुरातील चित्र 

The organ donation movement is still a wish on paper | Kolhapur: अवयवदानाची चळवळ अजूनही कागदावरील इच्छेपुरतीच, पुरेशा यंत्रणेअभावी चळवळीला खो

Kolhapur: अवयवदानाची चळवळ अजूनही कागदावरील इच्छेपुरतीच, पुरेशा यंत्रणेअभावी चळवळीला खो

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणाच नसल्यामुळे अवयवदानाचा फॉर्म भरण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याचे दिसून येत आहे. केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सध्या कोल्हापुरात सुरू असून, अजून कोल्हापुरात प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण झालेले नाही. अवयवदान चळवळीला यश येण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे.

कोल्हापुरात सध्या अवयवदान चळवळ केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनीपुरतीच मर्यादित आहे. एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूर मेडिकल हब होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आजही अनेक सुविधा नाहीत. अजून कोल्हापुरात प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण झालेले नाही. पुणे आणि बंगळुरू येथे याचे प्रत्यारोपण होते आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनविला गेला होता. कोल्हापुरात द फेडरेशन ऑफ ऑर्गन बॉडी डोनेशन मुंबई आणि यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर ही संस्था गेली ९ वर्षे जनजागृती करत आहे. योगेश आगरवाल आणि रेखा बिरांजे या उपक्रमाचे समन्वयक आहेत.

अवयवदान

  • १९९६ : इंडियन ॲनाटोमी ॲक्टनुसार काही खासगी आणि मेडिकल कॉलेजमध्येही अवयवदान स्वीकारले जाते.
  • ९ जुलै १९९४ : ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिशू ॲक्ट स्थापन
  • यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘नाटो’, त्याखाली रिजनल ऑर्गन टिशू ट्रान्सफर ऑर्गनायझेशन ‘रोटो’, प्रादेशिक स्तरावर स्टेट ऑर्गन टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘सोटो’ ही संस्था काम करते.
  • ‘झेडटीसीसी’ केंद्र : या संस्थेंतर्गत झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी कार्यरत आहे, ज्याला ‘झेडटीसीसी’ म्हणतात. या समितीचे पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई अशी चार केंद्रे कार्यरत आहेत.


आयुष्यमान भव योजनेंतर्गत ऑनलाइन दाते नोंद

  • कोल्हापूर : ३,१७८
  • महाराष्ट्र : १९,०००
  • भारत : ७०,०००


वैद्यकीय संस्थांचे योगदान

साल -  संस्था - देहदान  - संकल्प - दाते
१९९४ - डॉ.डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज - ३० देहदान  - ७७१ - ३५२
२०१६ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क - ४५ देहदान -  ३३८
२०१७ - डायमंड हॉस्पिटल  -  १३ ब्रेन डेड देहदान, - ११३ किडनी प्रत्यारोपण - १०० जिवंत दाते
२०१८ - आधार हॉस्पिटल   - ११ किडनी, १ लिव्हर, १ हृदयाचे ट्रान्स्फर प्रत्यारोपण
२०२२/२३ सनराइज हॉस्पिटल   - २१ प्रत्यारोपण
२०२३ ॲपल हॉस्पिटल  -  ३६ किडनी प्रत्यारोपण, १ लिव्हर ट्रान्स्फर प्रत्यारोपण
२०२४ अथायू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, उजळाईवाडी १ किडनी प्रत्यारोपण

Web Title: The organ donation movement is still a wish on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.