जोतिबा डोंगरावर तांदळाच्या पीठाचे दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम, नेमकी प्रथा जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:53 PM2022-10-04T18:53:05+5:302022-10-04T19:11:34+5:30

प्राचीन काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही सुरू आहे.

The practice of waving rice flour lamps on Jyotiba Temple exists today | जोतिबा डोंगरावर तांदळाच्या पीठाचे दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम, नेमकी प्रथा जाणून घ्या

जोतिबा डोंगरावर तांदळाच्या पीठाचे दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम, नेमकी प्रथा जाणून घ्या

googlenewsNext

दत्तात्रय धडेल

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा ) येथे दरवर्षी खंडे नवमी दिवशी पहाटेच्यावेळी जोतिबा डोंगरावरील सर्व सुवासिनी महिला नटून थटून जोतिबा मंदिर व परिसरातील सर्व देव देवतांना दिवे ओवाळतात. प्राचीन काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजही सुरू आहे. आजही हा सण जोतिबा डोंगरावर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पहाटे नटून-थटून सुहासिनींची पावले  पावले मंदिराकडे वळतात. पायरी रस्त्याने दिवे घेऊन येताना चे दृश्य मोहून टाकणारे असते. मंदिरातील सर्व देव देवतांना ओवाळले जाते. सूर्योदयापूर्वी हा सोहळा होतो.

या सोहळ्या विषयी असे सांगितले जाते की, दख्यनचा राजा श्री जोतिबा देवाने रत्ना सूर, रक्तभोज या राक्षसासह आणखी पाच राक्षसांचा वध केला. विजयादशमी दिवशी दख्खनच्या राजा जोतिबा देवांनी हा पराक्रम केला म्हणून या पराक्रमाची आठवण म्हणून डोंगरावर पंचप्राण ज्योतीचे प्रतीक म्हणून सुवासिनीनी ही दिवे ओवाळणीची प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते.

दिवे तयार करण्यासाठी तांदळापासून पीठ तयार केले जाते

दिवे तयार करण्यासाठी तांदळापासून पीठ तयार केले जाते. ते चुलीवर शिजवले जाते. त्यापासून विशिष्ट आकाराचे दिवे तयार करून त्यात तूप व वातू घालून ते प्रज्वलीत करण्यात येतात. महिलांच्या लगबगीने संपूर्ण डोंगर जागा असतो . डोंगरावर या सणास मोठे पारंपारीक महत्व आहे. जोतिबा डोंगरावर दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम आहे .

Web Title: The practice of waving rice flour lamps on Jyotiba Temple exists today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.