..अखेर कुंभी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:51 PM2023-01-05T18:51:15+5:302023-01-05T18:51:39+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ...
प्रकाश पाटील
कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ६ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच व्यूव्हरचना आखण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटांच्या प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठका सुरू झाल्या आहेत.
२९ नोव्हेंबरला सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. पण शासनाने राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका २० डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने सहकारी संस्थांच्या ज्या टप्प्यावर निवडणूक थांबवण्यात आल्या होत्या. त्या टप्यावरून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याने २१ डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करून निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदिप मालगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम कालावधी ३५ दिवसाचा करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२० मध्ये विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली होती. पण कोरोना, पावसाळ्यामुळे निवडणूक तब्बल दोन वर्षे पुढे ढकलली. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. कच्ची मतदार यादीवर हरकती होऊन २९ नोव्हेंबरला २३ हजार ६४ सभासद व ब वर्ग सभासद ३६४ अशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.निवडणूक लागणार की आणखी लांबणीवर पडणार याबाबत तर्कवितर्क सुरू होते.आता निवडणूक कार्यक्रम अधिकृत जाहीर झाल्याने याला पूर्ण विराम मिळाला आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी -६ ते १२ जानेवारी २०२३
उमेदवारी अर्ज छाननी - १३ जानेवारी
वैध,अवैध नामनिर्देशन व अंतिम उमेदवार यादी -१६ जानेवारी
उमेदवारी अर्ज माघार -१७ ते ३० जानेवारी
चिन्ह वाटप - ३१ जानेवारी
मतदान - १२ फेब्रुवारी
मतमोजणी - १४ फेब्रुवारी