पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:13 PM2022-02-09T13:13:38+5:302022-02-09T13:14:31+5:30

सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार

The remaining two matches of Kolhapur Mayor's Cup football tournament will be played in three days from Friday to Sunday | पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र..

पुन्हा सुरु होणार फुटबॉलचा थरार, महापौर चषकचे सामने शुक्रवारपासून; मात्र..

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षे स्थगित केलेले महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित दोन सामने शुक्रवार ते रविवार अशा तीन दिवसात खेळविण्यात येणार आहेत. जरी दोन वर्षानंतर शाहू स्टेडियमवर सामने होत असले तरी सामान्य फुटबॉल शैाकिनांना मात्र मैदानावर प्रवेश असणार नाही. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहातील हाही पहिलाच प्रसंग असेल.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मार्च २०२० मध्ये शाहू स्टेडियमवर महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु कोरोना संसर्ग सुरु झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेतील एक उपांत्य व अंतिम सामना स्थगित ठेवण्यास भाग पाडले. गेल्या दोन वर्षापासून सामने कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व जिल्हा प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस सामने घेतले जाणार आहेत. सामने पाहण्यास फुटबॉल शौकिनांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही. सामन्याचे युट्यूबवर थेट प्रसारण होणार आहे. 

महापालिकेत बैठक 

सामन्यांच्या आयोजनासंदर्भात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. यावेळी अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळ, सचिन जाधव, सचिन पांडवयांच्यासहनिलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील आदी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

असे होतील सामने -

शुक्रवारी - दिलबहार तालीम विरुध्द फुलेवाडी क्रीडा मंडळ (उपांत्य सामना)
शनिवारी - जनप्रतिनिधी विरुध्द प्रशासकिय अधिकारी-कर्मचारी
रविवारी दुपारी ३.३० वाजता - प्रॅक्टीस क्लव विरुध्द शुक्रवारच्या सामन्यातील विजेता (अंतिम सामना)

अशी असतील बक्षिसे-

विजेत्या संघास - एक लाख ५० हजार रुपये व चषक
उपविजेत्या संघास- ७५ हजार रुपये व चषक
तृतिय क्रमांक - ३५ हजार रुपये
चतुर्थ क्रमांक - २० हजार रुपये
याशिवाय अन्य बक्षिसे

Web Title: The remaining two matches of Kolhapur Mayor's Cup football tournament will be played in three days from Friday to Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.