'लोकमत महामॅरेथॉन'चा उद्या बिब कलेक्शन एक्स्पो, धावपटूंना तज्ज्ञ देणार टिप्स; आता प्रतीक्षा धावण्याची
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:07 PM2023-01-06T13:07:25+5:302023-01-06T13:08:13+5:30
कोल्हापूरकरांसह राज्य आणि परराज्यातील धावपटूंनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे नोंदणी तर वेळेपूर्वीच हाऊसफुल्ल
कोल्हापूर : पहिल्या पाच पर्वांना लाभलेल्या धडाकेबाज प्रतिसादानंतर आता रविवारी (दि.८) कोल्हापुरातील पोलिस मुख्यालय मैदानापासून रंगणाऱ्या लोकमत महामॅरेथाॅनच्या सहाव्या पर्वाचा थरार रंगणार आहे. नोंदणीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नोंदणी हाऊसफुल्ल झाली आहे. तत्पूर्वी उद्या शनिवारी पोलिस मुख्यालयातील अलंकार हाॅलमध्ये होणाऱ्या बीब एक्स्पो प्रदर्शनाची आस धावपटूंना लागली आहे. त्यामध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना टी-शर्ट, बिब (चेस्ट नंबर) , गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.
महामॅरेथाॅनच्या पाच पर्वांना मिळालेल्या ओसांडून वाहणाऱ्या प्रतिसादानंतर आताचे सहावे पर्वही अभूतपुर्व प्रतिसादाने ओसांडून वाहत आहे. बीब एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी होणार आहे. सहाव्या पर्वातही एक साद घातल्यानंतर हजारोंचा प्रतिसाद मिळाला. सर्वच प्रकारातील नोंदणी हाऊसफुल्ल झाली. आता प्रत्यक्ष स्पर्धकांना धावण्याची आस लागून राहिली आहे.
आयडी प्रूफ आवश्यक....
कसबा बावड्यातील पोलिस मुख्यालयातील अलंकार हाॅलमध्ये बीब एक्स्पोमध्ये जे स्पर्धक टी-शर्ट, गुडीबँग, बीब कलेक्शनसाठी येणार आहेत. त्यांनी किंवा पालकांनी आयडी आणणे आवश्यक आहे. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत. त्यांनी मित्र, नातेवाईकांकडे ॲथॅारिटी लेटर, रिसीट पाठवून द्यावी तरच ते साहित्य त्यांच्याकडे सुपूर्द केले जाईल. यासाठी ९०४९०८७६७७, ८७९६२४११११ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलिस मैदानावर यायला लागतय...
महामॅरेथाॅनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ऑनलाइन, डिजीटली संर्पक साधून आपली नोंदणी वेळ संपण्याआधीच केली. त्यामुळे नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि नोंदणी अल्पावधीतच हाऊसफुल्ल झाली. ज्या प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही. त्यांनी या स्पर्धकांना चिअर अप करण्यासाठी आणि स्पर्धेचा फिल अनुभवण्यासाठी रविवारी सकाळी सहा वाजता कसबा बावडा रोडवरील पोलिस परेड मैदानावर जरूर यावे. कोल्हापूरकर ही क्रीडाप्रेमींची नगरी आहे. मग तो खेळ कोणत्याही असू दे त्याला पाठिंबाही भरभरून देतात.
आता प्रतीक्षा धावण्याची
कोल्हापूरकरांसह राज्य आणि परराज्यातील धावपटूंनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे नोंदणी तर वेळेपूर्वीच हाऊसफुल्ल झाली. त्यामुळे आता धावपटूंना उद्या, शनिवारी होणाऱ्या बीब एक्स्पो प्रदर्शनाची आणि त्यानंतर रविवारी सकाळी होणाऱ्या महामॅरेथाॅनची उत्सुकता आहे. विशेषत: सरावात सातत्य असणाऱ्या धावपटूंना गेल्या वर्षीइतके अंतर इतक्या वेळेत पूर्ण केले आणि ठरविलेल्या वेळेतच पूर्ण करण्याची उत्सुकता लागली आहे.
लोकमत महामॅरेथाॅनचे राज्यात नव्हे तर देशात एक सुंदर आयोजन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. आता राष्ट्रीय पातळीवर या मॅरेथाॅनचा महिमा पोहचला आहे. लवकरच ही मॅरेथाॅन आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहचेल. ‘लोकमत’ने तरुणांमध्ये स्पर्धेच्या रूपाने नवा उत्साह निर्माण केला आहे. युवावर्गामध्ये शरीर सुदृढ आणि आरोग्यसंपन्न ठेवण्याची जागरूकता महामॅरेथाॅनमुळे तयार झाली आहे.