Kolhapur: कारमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक; ८ लाखांच्या मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:19 IST2025-03-22T12:18:37+5:302025-03-22T12:19:18+5:30
कोल्हापूर : गोवा बनावटीची मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून गवसे (ता. आजरा) येथे ...

Kolhapur: कारमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक; ८ लाखांच्या मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
कोल्हापूर : गोवा बनावटीची मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून गवसे (ता. आजरा) येथे शुक्रवारी एकाला अटक केली. गणपत प्रभाकर माईनकर (वय २९, रा. कोलगाव, चाफेआळी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. वाहनांसह त्याच्याकडून २९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ८ लाख ४० हजारांचे मद्य आहे.
गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक गवसे मार्गावर होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या मार्गावर सापळा रचला. संशयित माईनकर याचे चारचाकी वाहन थांबविले असता कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये १ हजार ५६० सीलबंद बाटल्यांचे १३० बॉक्स सापडले. यामध्ये विदेशी मद्याची किंमत ८ लाख ४० हजार रुपये आहे. तर वाहनाची किंमत सुमारे २१ लाख असून २९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पोवार, राहुल कुटे आदी सहभागी झाले. निरीक्षक के. एम. पवार पुढील तपास करत आहेत.