Kolhapur- अन् अखेर सरपंचांसह ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 03:41 PM2023-04-11T15:41:10+5:302023-04-11T15:41:37+5:30

ऐन उन्हात शेतकऱ्यांची पायपीट....

The villagers along with the sarpanch of Shendur knocked the floor and locked the office | Kolhapur- अन् अखेर सरपंचांसह ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

Kolhapur- अन् अखेर सरपंचांसह ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

googlenewsNext

दत्ताञय पाटील

म्हाकवे : शेंडूर (ता.कागल) येथील तलाठी तब्बल सहा महिन्यांपासून या कार्यालयातच आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कुचंबणा होत आहे. याबाबत तलाठ्यांसह थेट तहसीलदार यांना विचारणा केली. अर्ज विनंत्या केल्या. माञ, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत ग्रामस्थातून तीव्र असंतोष निर्माण झाला. त्याचेच प्रत्यंतर आज मंगळवारी सरपंच उपसरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनी तलाठ्यांच्या बेफिकिरीला कंटाळून अखेर तलाठी कार्यालयालाच टाळे ठोकले आहेत. 

सप्टेंबर २०२२ मध्ये येथील तलाठी श्रद्धा महाजन या बाळंतपणाच्या दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे येथील कारभार सिध्दनेर्लीचे तलाठी अमित लाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माञ, सप्टेंबरपासून ते आजतागायत एकही दिवस शेंडूरमध्ये आलेले नाहीत. याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या आहेत. तरीही तलाठी लाठे हे गावामध्ये हजर झालेले नाहीत. 

विशेष म्हणजे सिद्धनेर्ली येथे लाटे यांची प्रत्यक्ष भेट देवून शेंडूर कार्यालयात हजर राहण्याबाबत विनंती केली. माञ, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे  सरपंच अमर कांबळे व उपसरपंच अजित डोंगळे यांनी सांगितले. यावेळी सदस्य निवृत्ती निकम, संदीप लाटकर, सुखदेव मेथे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेवाळे, सचिन माने, दीपक पोवार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ऐन उन्हात शेतकऱ्यांची पायपीट....

सध्या, शासकीय कामासह बँक, संस्थेतील कर्ज प्रकरणे यासाठी सातत्याने सातबारा उतारे, रहिवासी दाखल्याची गरज भासते. यासाठी येथील शेतकऱ्यांना सिध्दर्नेलीला पायपीट करावी लागते. शेंडूरमध्ये ३ हजार २०० एकर शेत जमीन असून सुमारे अडीच हजाराहून अधिक खातेदार आहेत. 

''तलाठी लाटे यांना हजर व्हायचेच नव्हते तर त्यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारलाच का? तसेच, वरिष्ठ अधिकार्यानी गांभीर्याने लक्ष घालून अन्य तलाठ्यांकडे पदभार द्यावा - अमर कांबळे - सरपंच, शेंडूर

Web Title: The villagers along with the sarpanch of Shendur knocked the floor and locked the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.