Kolhapur: मुले पळवणारा समजून कोनवडेत ग्रामस्थांनी फिरस्त्याला दिला चोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 01:10 PM2024-08-22T13:10:00+5:302024-08-22T13:10:31+5:30

शिवाजी सावंत  गारगोटी: मुले पळवणारा चोरटा समजून फिरस्त्याला कोनवडे ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, गुरूवारी ...

the villagers beat Firastha mistaking him for a child abductor In Konvade kolhapur | Kolhapur: मुले पळवणारा समजून कोनवडेत ग्रामस्थांनी फिरस्त्याला दिला चोप 

संग्रहित छाया

शिवाजी सावंत 

गारगोटी: मुले पळवणारा चोरटा समजून फिरस्त्याला कोनवडे ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. आज, गुरूवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी अगरबत्ती विकण्यासाठी राधानगरी तालुक्यातील दोन फिरस्ते कोनवडे ता. तालुका भुदरगड येथे आले होते. त्यातील एक युवक लहान मुलीवर रागावला. त्यामुळे ती मुलगी ओरडू लागली. ग्रामस्थांना नेमके काय झाले हे समजले नाही. त्यांनी त्याला मुलं पळून नेणारा चोरटा समजून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना भुदरगड पोलिसांच्या ताब्यात दिले. 

यातील एकजण नेहमी या गावात विक्रीसाठी येत असल्याने त्याची ओळख पटली. आज पहिल्यांदा त्याच्या सोबत दुसरा तरुण आला होता. हा ओळखीचा असल्याने त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडून देण्यात आले. मात्र गैरसमजातून त्यातील एका युवकाला हकनाक बेदम मार खावा लागला.

तालुक्यात घडल्या दोन घटना

गावात दोन दिवसांपूर्वी दोन लहान मुलांना पळविण्याचा प्रयत्न झाला होता. याशिवाय भाटिवडे ता. भुदरगड येथील दोन सख्या भावांना पळवून नेण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी झाला होता. तालुक्यातील या घटना ताज्या असल्यामुळे ग्रामस्थांनी या दोन फिरस्त्याना बेदम मारहाण केली.

Web Title: the villagers beat Firastha mistaking him for a child abductor In Konvade kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.