कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 11:56 AM2023-07-08T11:56:07+5:302023-07-08T11:58:02+5:30

योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला

The water from the dam reached the jack well of Kalammawadi Direct Pipeline Scheme | कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर! थेट पाईपलाईनचे पाणी जॅकवेलमध्ये पोहोचले, लवकरच जलवाहिनीची चाचणी होणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या जॅकवेलमध्ये धरणातीलपाणी पोहोचल्याने या योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर असून धरणातील पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचले.

यावर्षी काळम्मावाडी धरण क्षेत्रात काम करण्यास भरपूर दिवस मिळाल्याने योजनेचे काम गतीने पूर्ण होत आहे. धरण क्षेत्रात जॅकवेलचे काम राहिले होते, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या. हे काम पूर्ण झाले असून मागच्या आठवड्यात कॉपर डॅम तोडण्यात आला. त्यामुळे जॅकवेलमध्ये पाणी येण्याची प्रतीक्षा लागून राहिली होती. ही प्रतीक्षा गुरुवारी रात्री संपली. जॅकवेलमध्ये पाणी आल्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. चाचणी म्हणून एका छोट्या पंपांद्वारे पाणी उपसाही शुक्रवारी करण्यात आला.

धरण क्षेत्रातील अडथळ्याची सर्व कामे पूर्ण पूर्ण झाली आहेत, आता त्यावर उपसा पंप जोडण्याची कामे सुरु झाली आहे. बिद्री येथील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामालाही शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. योजनेवरील २० किलोमीटर जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे. योजनेची सर्व कामे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न असून १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण योजनेची चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The water from the dam reached the jack well of Kalammawadi Direct Pipeline Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.