नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:04 PM2022-07-05T23:04:00+5:302022-07-05T23:41:34+5:30

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला.

The water level of the rivers rose, two pieces of NDRF filed in Kolhapur | नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

नद्यांची पाणीपातळी वाढली, कोल्हापूरात NDRF च्या दोन तुकड्या दाखल

Next

कोल्हापूर : राज्यात मुंबईसह विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून प्रशासन तयारीला लागले आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या आहेत. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एनडीआरएफच्या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा 9 च्या सुमारास कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली होती.  

एनडीआरफच्या 2 तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात काम करणार आहे. प्रत्येक तुकडीत 25 जवानांचा समावेश असून निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करेल. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य चांगल्याप्रकारे करेल, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरू नये, असे आवाहन यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार यांनी केले.
 

Web Title: The water level of the rivers rose, two pieces of NDRF filed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.