Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:40 PM2023-06-20T13:40:25+5:302023-06-20T13:41:39+5:30

आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवर पाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता

The water storage of Dudhganga dam was reduced for safety, Disclosure of Executive Engineer Vinaya Badami | Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

googlenewsNext

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या तांत्रिक अभ्यासानुसार स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी धरणातील ६ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आल्याचा खुलासा दूधगंगा कालवे विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी सोमवारी केला. मागील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवरपाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता.

राधानगरी तालुक्यातील दूधगंगा प्रकल्प अंतर्गत २५.४० टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, २००६ पासून त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित असून, प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटकला ४ टीएमसी पाणी दिले जाते. धरणाचा सांडवा व काही भाग असा ४९० मीटर लांबीचे दगडी बांधकाम असून, २००७ पासून गळती आहे. सुरुवातीला सेकंदाला ३६० लि. से. इतकी दुरुस्तीनंतर १६६ लि से. गळती निदर्शनास आली. मात्र, २०२१-२२ मध्ये पुन्हा ३५० लिटर गळती दिसून आली.

त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या पुण्यातील सीडब्ल्यु, पीआरएस संस्थेकडून पाहणी करून घेतली. त्यानुसार ही गळती धरणाच्या बांधकामाला छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने व धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने वाढली आहे. गळती काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून काम हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा १९.६८ टीएमसी इतकाच करावा असे निर्देश देण्यात आले.

गळती काढण्यासाठी ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे ८०.३६ कोटीचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्याने धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

Web Title: The water storage of Dudhganga dam was reduced for safety, Disclosure of Executive Engineer Vinaya Badami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.