Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 11:21 AM2022-06-15T11:21:14+5:302022-06-15T11:22:13+5:30

संसार व्यवस्थित असताना पाच महिन्यांपूर्वी अचानक पत्नीने मुलांना वाऱ्यावर सोडून, प्रियकराचा हात पकडून पलायन केले.

The wife ran away with her boyfriend and got remarried; Distressed husband attempts suicide in kolhapur | Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Crime News kolhapur: प्रियकरासोबत पळून जाऊन पत्नीने केलं दुसरं लग्न; व्यथित पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

कोल्हापूर : तीन गोंडस मुलांना व पतीला सोडून प्रियकराचा हात धरून पत्नीने पलायन केले, तसेच तिने प्रियकराशी लग्न केल्याचे फोटोही दोन दिवसापूर्वी पतीच्या मोबाईलवर पाठविले. हे फोटो पाहून व्यथित झालेल्या पतीने सोमवारी दुपारी स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले, तसेच सायंकाळी व मंगळवारी सकाळी दोनवेळा झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

भांबावलेल्या त्याच्या तीन लहान मुलांनी त्याला सरकारी रुग्णालयात आणले. ही घटना कोल्हापूर शहरानजीकच्या एका गावात घडली. अवघ्या ३२ वर्षांच्या मोलमजुरी करून घर चालविणाऱ्या या तरुणास तीन गोंडस मुले आहेत. संसार व्यवस्थित असताना पाच महिन्यांपूर्वी अचानक पत्नीने मुलांना वाऱ्यावर सोडून, प्रियकराचा हात पकडून पलायन केले.

७, १० अन् १३ वर्षे वयाच्या पोटच्या मुलांना सोडून पत्नी गेल्यामुळे पती व्यथित झाला. त्याने तिला वारंवार फोन करून घरी येण्याची विनंती केली. पण तिने नकार दिला. पत्नी बेपत्ताची तक्रारही पोलीस ठाण्यात दिली, पण पोलिसांनी शोधकार्यच राबविले नसल्याचे पतीने सांगितले.

पत्नीनेच पाठविले विवाहाचे फोटो

  • पळून गेलेल्या पत्नीने प्रियकराशी विवाह केल्याचे फोटो सोमवारी सकाळी त्याच्या मोबाईलवर पाठवले.
  • फोटो पाहून व्यथित झालेल्या पतीने पोटच्या लहान मुलांची काळजी न करताच स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून रक्तबंबाळ करून घेतले.
  • अखेर त्याच्या तीन लहान मुलांनी आजीच्या मदतीने त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारास आणले व उपचार करवून घरी नेले.
  • पण पुन्हा सायंकाळी व मंगळवारी सकाळी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिन्हीही मुले ‘सीपीआर’मध्ये कावरी-बावरी होऊन फिरत होती.
  • अखेर दुपारी त्याच्या बहिणीने रुग्णालयात येऊन त्या आपल्या तीन भाच्यांना मायेचा आधार दिला.

Web Title: The wife ran away with her boyfriend and got remarried; Distressed husband attempts suicide in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.