चित्रपटगृहांचा पडदा आज उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:12+5:302021-03-19T04:23:12+5:30

कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन आणि नंतर नवीन चित्रपटच नसल्याने तब्बल एक वर्ष बंद राहिलेल्या कोल्हापुरातील चित्रपटगृहांचा पडदा आज शुक्रवारी ...

Theaters will open today | चित्रपटगृहांचा पडदा आज उघडणार

चित्रपटगृहांचा पडदा आज उघडणार

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन आणि नंतर नवीन चित्रपटच नसल्याने तब्बल एक वर्ष बंद राहिलेल्या कोल्हापुरातील चित्रपटगृहांचा पडदा आज शुक्रवारी नव्याने उघडणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांतर्गत ५० टक्के आसनक्षमता, एक सीटचे अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा सूचनांचे पालन करत या व्यवसायाचा पुन्हा श्रीगणेशा होत आहे, यानिमित्त व्यवस्थापनानेही जय्यत तयारी केली आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर सर्वात आधी चित्रपटगृह बंद करण्यात आले. सहा महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर राज्य शासनाने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली पण नागरिकांमध्ये संसर्गाची भीती होती, त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येणार नाही या कारणास्तव सगळ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. नवीन चित्रपटच येत नसल्याने मालकांनी चित्रपटगृह बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने तब्बल एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात बसून नवनवीच चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. मुंबई सागा हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. तसेच दिवसभरात चार खेळ लावण्यात येत आहेत.

यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापनाने वर्षभर खुर्च्यांसह चित्रीकरणाच्या मशीन व साहित्यांवर चढलेली धूळ झटकली आहे. सर्व यंत्र नीट काम करत आहेत का याची तपासणी केली जात आहे. चित्रपटगृह व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

--

पद्मा टॉकीजला ८० वर्षे पूर्ण

लक्ष्मीपुरीतील पद्मा टॉकीजला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त टॉकीजचे नूतनीकरण करण्यात आले असून मुख्य स्क्रीनसह खुर्च्या व प्रेक्षागृहाचा लुक बदलण्यात आला आहे. प्रवेशद्वारात जुन्या काळातील कलाकारांपासून ते आजच्या स्टार कलाकारांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

--

फोटो नं १८०३२०२१-कोल-थिएटर ०१,०२

ओळ : कोल्हापुरातील पद्मा टॉकीजला ८० वर्षे पूर्ण होत असून आज शुक्रवारपासून चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी चित्रपटगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

Web Title: Theaters will open today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.