नाट्य कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव
By admin | Published: February 15, 2015 11:34 PM2015-02-15T23:34:50+5:302015-02-15T23:46:04+5:30
केशव देशपांडे : शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोपे
कोल्हापूर : हजारो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या नाटकांना प्रेक्षक नाहीत ही ओरड चुकीची आहे. पे्रक्षकांनी नाट्यगृहापर्यंत येण्याची वाट न पाहता, नाट्य कलाकरांनी प्रक्षेकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तुम्ही किती सरस आहात, हे सिद्ध करून त्यांना दाखवाल तेव्हा आपोआप प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचतील, असे मत अंबाजोगाई येथील निवृत्त प्रा. केशव देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाट्यशास्त्र विभागात गुरुवारी आयोजित ‘रंगमंचीय कला : वर्तमानकालीन बदलते प्रवाह’ या विषयावर आयोजित पहिल्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे होते. देशपांडे म्हणाले, मराठी रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी असे चर्चासत्र खूप उपयुक्त आहेत. कारण या चर्चासत्रातून रंगभूमी कशी समृद्ध करता येईल, टीव्ही व चित्रपटामुळे नाटकांवर कोणता परिणाम झाला आहे, प्रेक्षकांना कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे, या सर्व गोष्टींवर सर्वांनी आपले मत मांडले आहे. याचे चितंन करून आपण एक ठोस पर्याय काढला पाहिजे. याचा अभ्यास करून त्याची अंमलबाजवणी केल्यास रंगभूमी समृद्ध करण्यास नक्कीच मदत होईल. डॉ. शरद भुताडीया, नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन, संजय हळदीकर यांची भाषणे झाली. दोन दिवस चाललेल्या चर्चासत्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, बंगलोर आदी शहरांतील रंगकर्मी, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. व्ही. चिटणीस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तुटलेला संपर्क..
चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांनी एकाद्या विषयावर सखोल अभ्यास करून या ठिकाणी मांडणी केली आहे. या सखोल अभ्यासातून मराठी नाट्यभूमीला पुन्हा समृद्ध करण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. लोकांशी आपला तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्यासाठी हे चर्चासत्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तसेच विविध राज्यांतील नाट्यक्षेत्राची ओळख झाल्याने विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असाही सूर समारोपप्रसंगी उमटला.