Kolhapur- पट्टणकोडोलीतील तुळजाभवानी मंदिरात चोरी, देवीच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:35 PM2023-09-25T14:35:37+5:302023-09-25T14:36:00+5:30

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून चोरट्याने तब्बल अडीच ते तीन लाख रुपये ...

Theft at Tuljabhavani Temple in Pattankadoli Kolhapur, Thieves made off with money along with ornaments of the goddess | Kolhapur- पट्टणकोडोलीतील तुळजाभवानी मंदिरात चोरी, देवीच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Kolhapur- पट्टणकोडोलीतील तुळजाभवानी मंदिरात चोरी, देवीच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

googlenewsNext

पट्टणकोडोली : पट्टणकोडोली येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटी फोडून चोरट्याने तब्बल अडीच ते तीन लाख रुपये रकमेच्या दागिन्यांवर आणि पैशांवर डल्ला मारला आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला आहे.

पट्टणकोडोली मधील मराठा कॉलनीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर आहे. मध्यरात्री चोरट्याने मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करत चोरी केली. चोरट्यांनी देवीचे चांदीचे यासह मंदिराची दानपेटी फोडत तब्बल अडीच ते तीन लाखाचा ऐवज लंपास केला.

पहाटेच्या सुमारास मंदिराचे पुजारी मंदिरात आले असता त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. त्यांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Theft at Tuljabhavani Temple in Pattankadoli Kolhapur, Thieves made off with money along with ornaments of the goddess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.