खामकरवाडी येथे चोरी, तीन तोळे सोने व दहा हजार रुपयाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 02:50 PM2021-03-23T14:50:03+5:302021-03-23T15:02:50+5:30

Crime News kolhapur- खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील धनाजी भाऊ ऱ्हायकर यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला. दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याची खात्री करून पाठीमागील दरवाज्याची कडी उचकटून घरातील डब्यामध्ये असणारे तीन तोळ्याचे दागिने व दहा हजार रुपये लांबवले.

Theft at Khamkarwadi, three weights of gold and cash lamp of ten thousand rupees | खामकरवाडी येथे चोरी, तीन तोळे सोने व दहा हजार रुपयाची रोकड लंपास

खामकरवाडी येथे चोरी, तीन तोळे सोने व दहा हजार रुपयाची रोकड लंपास

Next
ठळक मुद्दे खामकरवाडी येथे चोरीतीन तोळे सोने व दहा हजार रुपयाची रोकड लंपास

धामोड : खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील धनाजी भाऊ ऱ्हायकर यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केला. दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याची खात्री करून पाठीमागील दरवाज्याची कडी उचकटून घरातील डब्यामध्ये असणारे तीन तोळ्याचे दागिने व दहा हजार रुपये लांबवले.

धनाजी ऱ्हायवर आपल्या पत्नी बरोबर शेतामध्ये ऊस भांगलण करण्यासाठी गेले होते. यांचे वडील भाऊ ऱ्हायकर हेही बाहेरगावी होते. दुपारच्या वेळी घरात कोणीच नसल्याची खात्री करून अज्ञात चोरटयानी घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी उचकटून घरात प्रवेश केला. घरातील भांडी लावण्याच्या कपाटावरील स्टिलच्या डब्यात असलेले माळ व गंठण असे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयाची रोकड लंपास करून पोबारा केला.

शेतकडे ऊस भांगलणीसाठी गेलेल्या वंदना ऱ्हायकर ह्या घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घराचे दरवाजे कोणीतरी उघडले आहेत हे समजले. त्यांनी तात्काळ घरात जाऊन तो दागिने असलेला डबा उघडला असता त्यात सोन्याचे दागिने व पैसे नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही घटना आपल्या पतीस सांगीतली.

पोलिस पाटील दिपाली ऱ्हायकर यांनी घटनेची वर्दी राधानगरी पोलीसात दिली. रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला . अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

 ही चोरी गावातीलच भुरटया पण दागिण्यांची माहिती असलेल्या चोरानेच केली आहे. कारण दागिण्याचा डबा वगळता घरातील इतर कोणत्याच वस्तूला स्पर्श केला नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे .

Web Title: Theft at Khamkarwadi, three weights of gold and cash lamp of ten thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.