कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर चोऱ्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:30+5:302021-02-27T04:30:30+5:30
मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी ते लव्हालादरम्यान रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांतून साखर, कांदा, बटाटे यांची चोरी करणारी टोळी ...
मलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील शाहूवाडी ते लव्हालादरम्यान रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांतून साखर, कांदा, बटाटे यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शाहूवाडी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली पाहिजे.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या मालवाहतुकीच्या गाड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.
कोकणातील जयगड बंदरामुळे साखर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दररोज साखरेचे सुमारे १०० ट्रक ये-जा करीत असतात. ट्रकचालक रात्रीच्या वेळी ट्रक रस्त्याकडेला लावून जेवणासाठी थांबतात, अशा वेळी अंधाराचा फायदा घेऊन ट्रकमधून साखरेची पोत्यांची चोरी केली जाते. मलकापूर , शाहूवाडी बाजारातील कांदे, बटाट्यांच्या पोत्यांची चोरी रात्रीच्या वेळी केली जात आहे. कांदा, बटाटा घेऊन जाणाऱ्या थांबलेल्या टेम्पोतून पोत्यांची चोरी केली जात आहे. त्यामुळे किरकोळ, घाऊक व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शाहूवाडी पोलिसानी एका सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्याला साखर पोती चोरीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चार दिवसांपूर्वी वारूळ येथे रस्त्याकडेला लावलेल्या ट्रकमधून साखरेची पोती चोरीला गेली, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती. शाहूवाडी पोलिसांनी अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या पहिजेत.