टेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 06:42 PM2021-04-12T18:42:43+5:302021-04-12T18:44:24+5:30

Crimenews Kolhapur : कोल्हापूर येथील टेंबलाई विद्यालय शाळा क्र. ३३ मध्ये अज्ञाताने कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक संच, मॉनीटर, प्रींटरसह सुमारे ७४ हजाराची चोरी केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

Theft of literature by breaking the noose in Tembalai school | टेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी

टेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देटेंबलाई विद्यालयात कडी कोयंडा तोडून साहित्याची चोरी संगणक संचासह ७४ हजाराची चोरी

कोल्हापूर : येथील टेंबलाई विद्यालय शाळा क्र. ३३ मध्ये अज्ञाताने कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक संच, मॉनीटर, प्रींटरसह सुमारे ७४ हजाराची चोरी केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, याबाबत राजारामपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

पोलिसानी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार ते रविवार शाळा बंद होती. त्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने शाळेचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने आतील संगणक संच, मॉनीटर, प्रोजेक्टर, ध्वनीक्षेप, प्रिंटर, स्पीकर आदी सुमारे ७४ हजार रुपये किंमतीचे साहित्याची चोरी केली. या चोरीची तक्रार विकास शामराव पिंगळे (रा. धनगर गल्ली, कसबा बावडा) यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Theft of literature by breaking the noose in Tembalai school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.