राज्य परिवहनच्या कर्मचारी निवासस्थानातून साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:26+5:302021-02-09T04:28:26+5:30
कोल्हापूर : राज्य परिवहन विभागाच्या शिवाजी पार्कातील बस आगाराच्या मागील बाजूस असलेल्या कर्मचारी निवासस्थानातील सुमारे पन्नास हजार रुपये ...
कोल्हापूर : राज्य परिवहन विभागाच्या शिवाजी पार्कातील बस आगाराच्या मागील बाजूस असलेल्या कर्मचारी निवासस्थानातील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य अज्ञाताने लोखंडी दरवाजा तोडून लांबविले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात मनोज सुरेश लिंग्रस (वय ५४, रा. काटकर काॅलनी, राजारामपुरी) यांनी सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राज्य परिवहन विभागाचे मध्यवर्ती बसस्थानकामागील बाजूस कर्मचारी निवासस्थान क्रमांक ४ आहे. या निवासस्थानातील ॲल्युमिनियम खिडक्या, पाण्याचे काॅक, आरसा, इलेक्ट्रिक स्वीच बोर्ड, वाॅटर पंप, स्टार्टर आदी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने २० डिसेंबर २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान लांबविले. ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार राज्य परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कर्मचारी काटकर यांनी शाहूपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत.