बावड्यातील निवारा कॉलनीत दोन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:23 AM2021-03-20T04:23:39+5:302021-03-20T04:23:39+5:30

कसबा बावडा : येथील निवारा कॉलनीमध्ये बंद घराच्या खिडकीचे गज तोडून रोख रक्कम लंपास करण्याचा प्रकार घडला. यावेळी ...

Theft of Rs 2 lakh at Bivada Shelter Colony | बावड्यातील निवारा कॉलनीत दोन लाखांची चोरी

बावड्यातील निवारा कॉलनीत दोन लाखांची चोरी

Next

कसबा बावडा :

येथील निवारा कॉलनीमध्ये बंद घराच्या खिडकीचे गज तोडून रोख रक्कम लंपास करण्याचा प्रकार घडला. यावेळी कपाटातील १ लाख ९० हजाराची रोकड लंपास केली. याबाबतची फिर्याद अमित संभाजी तहसीलदार यांनी शाहुपुरी पोलिसात दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, अमित संभाजी तहसीलदार हे बुधवार दिनांक १७ रोजी काही कामानिमित्त परगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी कपाटातील १ लाख ९० हजारांची रोख रोकड लंपास केली.

तहसीलदार हे घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी ताबडतोब शाहूपुरी पोलिसांशी यासंदर्भात संपर्क साधून फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शाहूपुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Theft of Rs 2 lakh at Bivada Shelter Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.